बीड जिल्ह्यात दोन वृद्ध कोरोना बाधितांचा मृत्यू
माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण येथील 70 वर्षीय वृद्धाचा रविवारी सकाळी अंबाजोगाई येथे मृत्यू झाला. सोमवारी पहाटे जे 34 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यात संबंधित वृद्ध रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्याच बरोबर आज पहाटेच्या रिपोर्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नवीन वसाहत, भाटवडगाव , (ता.माजलगाव) येथील 80 वर्षीय महिला रुग्णाचाही आज सोमवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात अखेर मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे आता एकूण दगावलेली रुग्ण संख्या 26 झाली आहे