बीड शहरातील काही ठिकाणची संचारबंदी शिथिल
बीड, दि.२३:-बीड शहरातील बीड मामला, पांडे गल्ली बालाजी मंदिराजवळ , परवाना नगर खंडेश्वरी रोड, विद्यानगर पश्चिम आणि मोमिनपुरा
या भागातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी कळविले आहे.
बीड शहरातील बीड मामला, पांडे गल्ली बालाजी मंदिराजवळ , परवाना नगर खंडेश्वरी रोड, विद्यानगर पश्चिम आणि मोमिनपुरा या भागात काही परिसरातील असलेले कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात आले आहे
या ठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.
बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.