आनंदाची बातमी;35 बॅंकेतील 8 लाख कर्मचाऱ्याना भरघोस पगारवाढ

मुंबई: करोना काळात सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात घट होत आहे. कुठे पगार कपात, कुठे कर्मचारी कपात होत असताना एका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठी पगार वाढ मिळणार आहे. इतक नव्हे तर कामगिरीच्या आधारे प्रोत्साहनपर भत्ता देखील दिला जाणार आहे.

करोना व्हायरसमुळे लॉकडाउनच्या काळात अनेक कंपन्यांनी पगार कपातीचे धोरण लागू केले. तर गेल्या काही दिवसात अनेकांना कामावरून कमी करण्यात आले. अशा परिस्थितीत सार्वजनिक बँक कर्माचाऱ्यांसाठी मात्र आनंदाची बातमी आली आहे. या कर्मचाऱ्यांना वेतनात १५ टक्केची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतक नव्हे तर त्याच्या कामगिरीच्या आधारे प्रोत्साहनपर भत्ता (PLI)दिला जाणार आहे. ही वाढ १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू होणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही पगार वाढ नोव्हेंबर २०१७ पासून मिळणार आहे. याचा अर्थ एरियर म्हणून देखील मोठी रक्कम त्याच्या हाती येईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील ही पगार वाढ गेल्या ३ वर्षापासून प्रलंबित होती. बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन (IBA) यांच्यात या संदर्भात बुधवारी ११वी बैठक झाली. या बैठीकत हा निर्णय घेण्यात आला.
७ हजार ९८८ कोटी अतिरिक्त खर्च
ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०१७ च्या हिशोबाने कर्मचाऱ्यांना १५ टक्के वाढ दिली जाणार आहे. यामुळे बँकांवर जवळपास ७ हजार ९८८ कोटी इतका अतिरिक्त खर्च पडणार आहे.
याआधी २०१२ साली IBMच्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगार वाढ दिली होती. आता २०१७ ते २०२२ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी बँक युनियनने २० टक्के वाढ देण्याची मागणी केली होती. तर IBMने १२.२५ टक्के इतकी वाढ देण्याची तयारी दाखवली होती. या पगार वाढीवर दोन वर्ष चर्चा सुरू होती. बँक युनियनने त्यांच्या मागण्यांसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. अखेर प्रोत्साहनपर भत्ता देण्याची मागणी मान्य करण्यात आली. हा प्रोत्साहनपर भत्ता प्रत्येक बँकांच्या नफ्याच्या आधारावर असेल.खासगी आणि विदेशी बँका अशा प्रकारचा प्रोत्साहनपर भत्ता देतात. आता सार्वजनिक बँकातील सर्व कर्मचाऱ्यांना PLI शिवाय प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.बँक युनियन आणि IBM यांच्यात झालेल्या करारानुसार सर्व बँक कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी पाच दिवसांच्या प्रिव्हलेज लिव्हच्या बदली रोख रक्कम मिळेल. कर्मचाऱ्याचे वय जर ५५ वर्षापेक्षा जास्त असेल तर हा कालावधी ७ दिवसांचा असेल. याच बरोबर नॅशनल पेन्शन फंडमध्ये बँक त्याचे योगदान वाढवून १४ टक्के करणार आहे. हे सध्या १० टक्के इतके आहे. या बाबत सरकारची परवानगी घ्यावी लागेल.बुधवारी मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयात ही बैठक झाली. या पगारवाढीचा फायदा ३५ बँकेतील ८ लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!