कोरोना जोमात आणि लोकं कोमात:मटण पार्टी गावकऱ्यांच्या अंगलट आली

मंगळवेढा: कोरोनाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. पण अजूनही काही प्रमाणात लोकं आपल्याकडे कोरोना नाही, आपल्याला काही होत नसत, म्हणून बिनधास्त आहेत. या कोरोनाने सर्व थोरांचे अंदाज खोटे ठरवले. कोरोना जोमात आणि लोकं कोमात असं वातावरण जगभर असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र अचंबित करणारा प्रकार घडला.

त्याच झाल असं, लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांच्या तोंडाची चव गेली. काहीतरी खमंग, ठसकेबाज हवं म्हणून मंगळवेढा तालुक्यातील एका गावात एका कुटुंबाकडून मटणाचा बेत आखण्यात आला. मटण मिळतंय म्हणून गावातील नागरिक देखील पार्टीत शामिल झाले. मटणाच्या आशेने तालुक्याहून देखील खास पाहुणे आले. सोशल डिस्टन्स’चे तीन-तेरा वाजवत सर्वांनी मटणावर जोमाने ताव मारला.

आज खूप दिवसांनी मटणावर ताव मारल्याचा आनंद गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही. कारण मटण पार्टीत तालुक्याहून आलेल्या तीन जणांचे कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आले. त्यामुळे जोमात असलेलं संपूर्ण गाव कोमात गेलं. मटण खाण्याचा आनंद असलेले चेहरे भीतीने हिरमुसून गेले. आता पूर्ण गावाला क्वारंटाईन केलं असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकाणावर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर म्हणाले, सदर प्रकरणाची चौकशी करत आहेत.  यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

सरकारकडून खबदरदारी घेण्याची सूचना 

देशासह महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र सरकार वेळोवेळी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करत आहे.

ग्रामीण भागात कोरोना नाही म्हणून बिनधास्त राहू नका 

कोरोना शहरी भाग आणि गर्दीच्या ठिकाणी वेगाने वाढत आहे. आता कोरोना ग्रामीण विभागात देखील शिरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. आपल्याकडे कोरोना नाही म्हणून बिनधास्त राहू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!