कोरोनाचा कहर सुरूच:आज पुन्हा 14पॉझिटिव्ह:24 तासात 25 रुग्ण

बीड जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवणे आता अवघड होऊन बसले आहे कालच रात्री आलेल्या अहवालात 11 पॉझिटिव्ह आढळून आले तर आणखी आज आलेल्या मध्ये 14 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

बाधित रुग्णांचा आकडा 316 वर जाऊन पोहोचलो आहे त्यापैकी 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर जिल्ह्यात आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालेला आहे सध्या ॲक्टिव रुग्णांची संख्या 133 असून ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे तो भाग कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात आला आहे आता आरोग्य विभागाच्या वतीने त्या संपूर्ण भागात असलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी धावपळ करत असले तरी नागरिकांनी आता याचे गांभिर्य लक्षात घ्यायला हवे कोरोनाचे संक्रमण आता मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांनाच आता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे आज पाठवण्यात आलेल्या अहवालामध्ये देखील 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत,
अनेक लोक लक्षणे असतानाही ती स्पष्ट करत नाहीत त्यामुळे एकमेकांना त्याचा धोका निर्माण होऊ लागला आहे
आजच्या अहवालात बीड 6,परळी 5,गेवराई 1 ,अंबाजोगाई 1,तर आष्टी 1 असे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!