परशुराम संस्कार सेवा संघाच्यावतीने 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
बीड (प्रतिनिधी)ः- परशुराम संस्कार सेवा संघ बीड यांच्यावतीने ब्राह्मण समाजातील एचएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन जोशी, बाळासाहेब थिगळे, संजयराव कुलकर्णी, बाबा पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17 जुलै 2020 रोजी माऊली-आरती आपार्टमेंट येथे शासनाचे सर्व नियम पाळून तसेच सामाजिक अंतराचे नियम पाळून संपन्न झाला.
कोरोणा रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील शासनाच्या सामाजिक अंतराचे नियम पाळून परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र जिल्हा बीड याच्यावतीने 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना संघाचे अध्यक्ष गजानन जोशी यांनी गुणवंताच्या पाठीवर यशाची थाप टाकून त्यांना नेहमी प्रोत्साहन मिळावे यासाठी परशुराम संस्कार संघ सदैव समाज उपयोगी कार्यक्रम घेत असते. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे हाच या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थी सत्कार करुन त्यांना परशुराम संस्कार सेवा संघाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष रमाकांत कुलकर्णी यांनी केले तर अर्चना जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास महेश जोशी, कमलाकर बेहेरे, प्रकाश जोशी, ओंकार लिंग्रस, ओंकार देशपांडे, मनोज गोले, प्रसाद कुलकर्णी, नितीन भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.