आनंदाची बातमी!भारतात विकसित लसींचा प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी, मानवी चाचणीला परवानगी

रशियामध्ये लससंशोधनाचे सुरुवातीचे टप्पे यशस्वी झाले आहेत. रशियाने लससंशोधनाला वेग दिला आहे. त्याच प्रमाणे चीन, अमेरिका यांनीदेखील संभाव्य लसींवरील संशोधन जलदगतीने करण्याचे ठरवले आहे.
ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड लसही मानवी चाचणीसाठी वेगाने प्रयोग केले जात आहेत.
भारतातही संभाव्य लसींचा प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाला आहे.
करोनावर दोन लसी विकसित करण्यात आल्या असून प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे.
उंदीर आणि ससा यांच्यावर या लसींचा प्रयोग करण्यात आला.
दोन्ही स्वदेशी लसींची टॉक्सिसिटी स्टडीज यशस्वी झाली आहे
दोन्ही मानवी लसींच्या चाचणीसाठी तयारी करण्यात आली असून या दोन्ही लसींसाठी एक – एक हजार नागरिकांचा क्लिनिकल स्टडीही करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
‘आयसीएमआर’ने १५ ऑगस्टपर्यंत लसनिर्मितीची अपेक्षा व्यक्त करणारे पत्र मानवी चाचणी घेणाऱ्या रुग्णालयांना लिहिल्यानंतर वाद निर्माण झाला होता.
भारतातील यशस्वी लसनिर्मितीसाठी किती काळ लागेल हे मात्र भार्गव यांनी स्पष्ट केले नाही
भारतानेही जगाबरोबर राहिले पाहिजे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.
जगभरात निर्माण होणाऱ्या लसींपैकी ६० टक्के निर्मिती भारतात होत असल्याने कोणत्याही देशाने लस निर्माण केल्यास त्यांना भारताशी संपर्क साधावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!