स्टेट बँकेत ‘या’ पदांसाठी मोठी भरती; अर्ज करण्यासाठी राहिले अखेरचे तीन दिवस
भारतीय स्टेट बँकेत अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्टेट बँकेनं स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या निरनिराळ्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत.
जर तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, इंजिनिअर, एमबीए, पीजीडीएम किवा चार्टर्ड अकाऊंटंट असाल तर तुम्हाला स्टेट बँकेत नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. कोणत्या पदासांठी भरती प्रक्रिया आहे आणि कधीपर्यंत अर्ज करता येणार आहे हे आपण पाहुया.
पदांची माहिती
एसएमई क्रेडिट अॅनालिस्ट – 20 पदं
प्रोडक्ट मॅनेजर – 6 पदं
मॅनेजर (डाटा अॅनालिस्ट) – 2 पद
मॅनेजर (डिजिटल मार्केटिंग) – 1 पद
फॅकल्टी, एसबीआयएल, कोलकाता – 3 पदं
सिनिअर एक्झिक्यूटिव्ह (डिजिटल रिलेशन्स) – 2 पदं
सिनिअर एक्झिक्यूटिव्ह (अॅनालिटिक्स) – 2 पदं
सिनिअर एक्झिक्यूटिव्ह (डिजिटल मार्केटिंग) – 2 पदं
बँकिंग सुपरवायजरी स्पेशलिस्ट – 1 पद
मॅनेजर (एनिटाईम चॅनल) – 1 पद
डिप्टी मॅनेजर (आयएस ऑडिट) – 8 पदं
वाइस प्रेसिडेंट (स्ट्रेस्ड असेट्स मार्केटिंग) – 1 पद
चीफ मॅनेजर (स्पेशल सिच्युएशन टीम) – 3 पदं
डिप्टी मॅनेजर (स्ट्रेस्ड असेट्स मार्केटिंग) – 3 पदं
हेड (प्रोडक्स, इनव्हेस्टमेंट अँड रिसर्च) – 1 पद
सेंट्रल रिसर्च टीम (पोर्टफोलियो अॅनालिसिस अँड डाटा अॅनालिटिक्स) – 1 पद
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – 1 पद
इनव्हेस्टमेंट ऑफिसर – 9 पदं
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी) – 1 पद
रिलेशनशिप मॅनेजर – 48 पदं
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) – 3 पदं
एकूण पदांची संख्या – 119
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची प्रक्रिया २३ जूनपासून सुरू करण्यात आली असून १७ जुलै ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. अधिक माहितीसाठी https://sbi.co.in/web/careers/current-openings या संकेस्थळाला भेट द्या.