बीड

परळी शहराचा लॉक डाऊन सहा दिवसांसाठी वाढवला

परळी शहरामध्ये संचारबंदी आदेशात 20 जुलै 2020 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत वाढ

बीड, दि. १४:—परळी शहरामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्याप्रमाणात होत असून यामुळे रुग्ण संख्ये मध्ये मोठी वाढ होत आहे. या विषाणू संक्रमित झालेल्या व्यक्तींचा कसून शोध घेणे आणि कोरोना संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे आहे यासाठी 20 जुलै 2020 रोजीचे रात्री 12 वा पर्यंत परळी शहर बंद ठेवण्यात आले असून याबाबत संचारबंदी कायम करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत

यापूर्वी परळी शहरातून इतर भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रकिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार परळी शहरात पहिल्यांदा दि १२ जुलै आणि नंतर त्या मध्ये वाढ करुन १४ जूलै २०२० रोजी रात्री १२ पर्यंत संपूर्ण संचारबंदी घोषीत करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सदर आदेश पुढील 6 दिवसांसाठी म्हणजेच दिनांक 20 जुलै 2020 रोजीचे रात्री 12.00 वा पर्यंत वाढ करण्यात आला आहे.

परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील पाच अधिकारी/कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आढळून आले होते. सदर बँकेमध्ये परळी शहर व परिसरातील अनेक नागरिकांनी मोठया प्रमाणत ये-जा झाली असून प्रतिंबधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे.

जिल्ह्यात दिनांक ३१ जूलै २०२० रोजीचे रात्री 12.00वा. पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *