बीड शहरात दत्तनगर व हनुमंतवाडी(अंबाजोगाई)येथे संचारबंदी लागू

बीड, दि, 14 :– अंबाजोगाई तालुक्यातील हनुमंत वाडी व बीड शहरातील त्रिमुर्ती कॉलनी क्रमांक 03 दत्तनगर येथे कोरोना विषाणूची लागण covid 19 positive झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे काही भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.

याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

बीड शहरातील त्रिमुर्ती कॉलनी क्रमांक 03 दत्तनगर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

तसेच अंबाजोगाई तालुक्यातील हनुमंत वाडी या गावात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

तसेच या दोन्ही ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्य शासनाने लॉक डाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1) (3) लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!