बीड शहरातील तीन मुख्य भागात संचारबंदी लागू- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड
बीड शहरात कोरोना विषाणूचा पॉझिटिव्ह रुग्ण ज्या भागात आढळून येतो त्या भागात संचारबंदी लागू करण्यात येते त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड शहरातील किल्ला मैदान, बालेपिर भागातील राजू नगर आणि संभाजीनगर या तीन भागात कंटेनमेंट झोन घोषित करून अनिश्चित कालावधी साठी पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे किल्ला मैदान परिसरात मिलिया कॉलेज परिसर किल्ला मैदान हा पूर्णपणे बंद राहील तसेच नगर रोड बालेपीर भागात राजुनगर येथील मोहम्मद आरिफ यांच्या घरापासून शेख नजीर शेख नईम यांच्या घरापर्यंत संचारबंदी असेल तसेच संभाजीनगर भागात शेख खलीउद्दीन शेख यांच्या घरापासून विजयकुमार वीर यांच्या घरापर्यंत कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून या तीनही भागात अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकतेच काढले आहेत बीड शहरात दोन दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत आल्यामुळे 11 भाग सील करण्यात आले आहेत आजही तीन भाग पूर्ण वेळ संचारबंदी म्हणून घोषित करण्यात आले आहे