बीड शहरातील कंटेनमेंट झोन वगळता शहरातील संचारबंदीत शिथिलता-जिल्हाधिकारी राहुल रेखावर
संचारबंदी शिथिल मात्र जमावबंदी लागू
बीड, दि.१०:– बीड शहरातील विविध भागात येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले रुग्ण वाढत असल्यामुळे संपूर्ण शहरात 1 ते 9 जुलै 2020 या कालावधीत संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली होती जेथे सध्या कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत असे अकरा भाग वगळता पूर्ण शहरातील संचार बंदी शिथील करण्यात आली आहे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .
बीड शहरातील विविध अकरा ठिकाणी कोरोना बाधित झालेले रुग्ण आढळून आले आहेत
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे.
यामुळे बीड शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनी येथील शेख महेमुद शेख मसूद यांच्या घरापासून शेख ताजोदीन यांच्या घरा पर्यंतचा परिसर तसेच आसेफ नगर येथील सय्यद सिराजुद्दीन सय्यद खुदबोधीन यांच्या घरापासून शेख मतीन मोहम्मद उस्मान यांच्या घरापर्यंतचा परिसर , बीड मसला येथील आयेशा किराणा( शेख इब्राहिम मोहम्मद )यांच्या घरापासून अब्दुल मुजीब अब्दुल वाहेद मोमीन यांच्या घरापर्यंत आणि औटेगल्ली (ठिगळे गल्ली जवळील) अखीलोदिन सरदार इनामदार यांच्या घरापासून ते विशाल विजयकुमार थिगळे यांच्या घरापर्यंतचा परिसर येथे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे
याच बरोबर पांडे गल्ली बालाजी मंदिराजवळ येथील गणेश मदनराव बलदावा यांच्या घरापासून बाबुराव माणिकराव धायगुडे यांच्या घरापर्यंत तसेच डीपी रोडवरील बीएसएनएल ऑफिस जवळ बारकुल हॉस्पिटल पासून ते आजिनाथ नवले यांच्या घरापर्यंतचा परिसर आणि परवाना नगर खंडेश्वरी रोड येथील महारुद्र नागनाथ अप्पा माडेकर यांच्या घरापासून श्री दत्त मंदिर पर्यंतचा परिसर येथे कंटेनमेंट झोन घोषित केले आहे
यासह बीड शहरातीलच विद्यानगर पश्चिम मधील घुमरे कॉम्प्लेक्स , गोविंद नगर येथील बळीराज कॉम्प्लेक्स पासून ते गोपाळ अपार्टमेंट पर्यंत आणि आणि मोमीन पुरा येथील सागर कटपिस सेंटर (रफीक सेट) पासून ते फातेमा बुक डेपो( मुक्ती कौसर सादती )पर्यंतचा परिसर येथे कंटेनमेंट झोन घोषित केले आहे.
शहरातील राजुरी वेस ते कोतवाली वेस या भागात 29 जून पासून आज पर्यंत दहा रुग्ण आढळून आले असल्याने यासह आजूबाजूचा परिसर यामध्ये कारंजा , अजीजपुरा , बलभीम चौक, छोटी राज गल्ली, काळे गल्ली व जुना बाजार या भागात कंटेनमेंट जून घोषित केले आहे
बीड शहरातील या ११ भागात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात आला आहे .
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.