कोरोनाचे मीटर सुरूच:आज 6 पॉझिटिव्ह:आकडा वाढला

बीड जिल्ह्यात कोरोनाचे मीटर आता पुढे सरकू लागले आहे बाधीत रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे एकाच दिवशी 17 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आज पुन्हा 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

आज 09/जुलै रोजी 258 अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यात
बीड – 117,अंबाजोगाई – 41
परळी – 48,माजलगाव – 19
गेवराई – 16,आष्टी – 17 जणांच्या सॅम्पलचा समावेश होता सर्वाधिक सॅम्पल हे बीडमधून घेण्यात आले तर परळीतूनही अधिक सॅम्पल होते कालच बीड 6 व परळीत 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे
बीड जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 190 असून 7 मयत आहेत तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या सध्या 68 आहे आजपर्यत 117 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यात ही नवीन भर पडली आहे
जिल्हा रुग्णालयातून 2 व्यक्तींचे सॅम्पल घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे या दोन्ही मयतांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे


आजच्या अहवालामध्ये बीड शहरातून केवळ एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे
आजच्या अहवालामध्ये अंबाजोगाई येथील दोन रुग्ण असून धारूर मधील एक आहे तर परळी शहरातूनही एकच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे गेवराई तालुक्यातील उमापूर येथील 34 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला असून बीड येथील 50 वर्षीय महिला काळे गल्ली येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!