बीड

बीड जिल्ह्यातील आणखी दोन जण कोरोना पॉजिटीव्ह

येवलवाडी आणि कारखेल येथील दोघे पॉझिटिव्ह

बीड – बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आला असून त्याच्यावर नगर ला तर आष्टी तालुक्यातील कारखेल येथील एक व्यक्ती बाधित आढळून आला असून त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या भागात कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या लोकांसोबत च कुठेही बाहेर न गेलेलं लोकही बाधित आढळत आहेत. पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथील एक जण पॉझिटिव्ह आढळून आला असून त्याच्यावर नगर ला तर कारखेल येथील एकजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने या रुग्णावर पुण्यात उपचार सुरू आहेत. बीड जिल्ह्यात शनिवारी नऊ पॉझिटिव्ह आल्यानंतर आता हे दोन नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी पाटोदा आणि आष्टी तालुक्यातील काही भाग कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *