खा प्रितम मुंडेंची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. 12 उपाध्यक्ष, पाच सरचिटणीसांचा समावेश आहे. एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि विनोद तावडे हे विशेष निमंत्रित प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणून काम पाहतील. तर पंकजा मुंडे यांनी राज्यापेक्षा केंद्रात लक्ष घालावे ही केंद्राची इच्छा असल्याचे पाटील यांनी सांगितले. नाराज असलेल्या अनेकांना पक्षसंघटनेत सामावून घेऊन त्यांना परस्पर संकेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दर तीन वर्षांनी भाजपची कार्यकारिणी बदलते. मात्र, कोरोना संसर्गामुळे राज्य कार्यकारिणी रखडली होती.

भाजप कार्यकारणी
12 प्रदेश उपाध्यक्ष
5 सर चिटणीस (प्रदेश महामंत्री)
एक कोषाध्यक्ष
5 मोर्चाचे अध्यक्ष
सरचिटणीस – सुजित सिंघ ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय

उपाध्यक्ष : राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हाळवणकर, प्रसाद लाड, प्रीतम मुंडे, चित्रा वाघ यांच्यासह इतर नावे आहेत.

कोषाध्यक्ष : मिहीर कोटेचा
प्रतोद : माधुरी मिसाळ
उमा ताई खापरे – महिला मोर्चा अध्यक्ष
विक्रांत पाटील, पनवेल – युवा मोर्चा अध्यक्ष

पंकजा मुंडे यांना केंद्रात जबाबदारी मिळेल

पक्षात नाराजी नसली तर जिवंतपणाचे लक्षण नसते. त्यामुळे नाराजी असलीच पाहिजे. पण सदा सर्वकाळ कोणी नाराज नसते, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि विनोद तावडे हे विशेष निमंत्रित प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणून काम पाहणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर पंकजा मुंडे यांनी राज्यापेक्षा केंद्रात लक्ष घालावे ही केंद्राची इच्छा आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांना केंद्रात जबाबदारी मिळणार असल्याचं पाटील म्हणाले.

संधी मिळाल्याचा आनंद : चंद्रशेखर बावनकुळे

प्रदेश कार्यकरिणीवर सरचिटणीस म्हणून संधी मिळाल्याचा आनंद आणि समाधान आहे. ऑक्टोबर महिन्यात जेव्हा तिकीट नाकारले गेले त्यानंतर पक्षाने निवडणूक प्रचार, कोरोना मदत कार्य, संघटनाचे कार्य सोपविले. ते सर्व काम पूर्ण क्षमतेने केले. आता संघटनेत जोमाने काम करुन लोक हिताच्या विरोधात काम करणाऱ्या राज्य सरकार विरोधात संघर्ष उभा करू. चंद्रकांत दादा यांनी तुलनेने युवा टीम निवडली आहे. संघटनेत 12 ते 14 तास काम करावं लागतं. त्यामुळे युवा टीम त्या क्षमतेने काम करेल. अनुभव असलेले खडसे कार्यकारिणीत असतील असे प्रदेशाध्यक्ष यांनी जाहीर केलेच आहे, पंकजा ताई यांना केंद्रात जबाबदारी दिली जाईल. त्यामुळे कोणीही नाराज असण्याचे कारण नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!