आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना

पंढरपूर – कोरोनामुळे विविध नियम बंधनांमध्ये पंढरपुरात बुधवारी पहाटे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते.महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे” असे साकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी आज घातले.दरम्यान, यंदा महापूजेचे मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) हे दाम्पत्य ठरले. मुख्यमंत्र्यांसोबत ते महापूजेत सहभागी झाले होते. तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!