बीड

बीड शहरातील मसरत नगर येथील संचारबंदी शिथील-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड शहरातील मसरत नगर येथील संचारबंदी शिथील-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि.२७:-बीड शहरातील मसरत नगर येथे कोरोना विषाणू बाधित (कोविङ -१९) 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले होते. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती. शासनाचे नियमानुसार येथील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी या प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये दि 15 जून पासून मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे कळविले आहे.
यामुळे बीड शहरातील मसरत नगरचा हॉटेल हिना जालना रोड ते जिशान मोमीन यांच्या घरा पर्यंतचा भाग येथील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *