सरकारचा अनलाॅक 2 प्लॅन !1जुलैपासून हे नियम लागू शकतात
मुंबई : कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्याचं काम हळूहळू ठाकरे सरकार करत आहे. लाॅकडाऊन करताना जशी खबरदारी घेतली गेली तसं
आता अनलाॅकच्या वेळी खबरदारी घेतली जातेय. टप्प्याटप्यानं सर्व काही पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारचा असणार आहे. महाराष्ट्रातले काही जिल्हे पुर्वपदावर आले आहेत. पण काही महानगरपालिकांचे भाग आजही कोरोनाच्या विळख्यात आहेत. त्यामुळे या पालिकांच्या शहारांकडे अनलाॅकसाठी सरकारची तयारी सुरु आहे.
1 जुलैपासून काय काय सुरु होण्याची शक्यता
एसटी
गेले अनेक महिने जिल्हाअंतर्गत अडकलेले किंवा रोजगारासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हयात जाण्यासाठी एसटी सुरु करण्याचा विचार सरकार करतंय. काही ग्रामीण भागात
एसटीची सुविधा सुरु आहे. मुंबई, पुणे या सारख्या शहरात जर एसटी सुरु करायची झाली तर कठोर निर्बंध घालून सुरु करण्यात येईल.
रिक्षा, टॅक्सी
अनेक काॅर्पोरेट कॅपन्यांचे कर्मचारी हळूहळू कामावरू रुजू होत आहेत. पण त्यांना कामावर जाण्यासाठी बेस्ट आणि एसटी बसेसचा वापर करावा लागतोय. पण बसेस आणि
कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता ती अपुरी आहे. त्यामुळे सम विषम नंबर प्लेट प्रमाणात रिक्षा, टॅक्सी रस्त्यावर उतरवू शकतो का यांवर सध्या विचार सुरु आहे.
शाळा, काॅलेज सुरू करण्याचे नियोजन
रेड झोन मध्ये नसलेल्या 9, 10, 12 वी शाळा-कॉलेज जुलैपासून, 6 वी ते 8 वी ऑगस्टपासून, वर्ग 3 ते 5 सप्टेंबरपासून, वर्ग 1 ते 2 री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्यात येईल.
परिस्थिती बघून जिल्ह्यांच्या सीमांवर निर्णय
सध्या थोडीसी मोकळीक दिली तर लगेच गर्दी होताना दिसते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस हे ज्या पद्धतीने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत. त्यांच्यावर अजून ताण नको म्हणून जिल्ह्यांची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल. जिल्ह्याबाहेर अडकलेल्या स्थानिक किंवा नातेवाईंकासाठी काटेकोरपणे नियम पाळूनच प्रवेश असेल. रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेणार. कंटेन्मेंट क्षेत्राकडे अधिकाधिक देऊन क्षेत्र जितकं लहान ठेवता येईल तितकं लहान ठेवण्याच्या प्रयत्न असणार आहे. या क्षेत्रांमध्ये रोज तपासण्या, फवारणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा प्लॅन आहे.
सोबतच माॅल्समधील शाॅप्स अल्टर्नेट सुरु करण्यावर विचार सुरु आहे.
:- सिनेमा, नाट्यगृहांवर अद्याप कोणाताही निर्णय नाही
:- केद्रांच्या ग्रीन सिग्नलनंतर राज्यात लोकल सेवा सुरु होणार, अद्याप कोणताही निर्णय नाही