बीड शहरात कोरोना मीटरची रिडींग वाढू लागली:आज आढळले 4 पॉझिटिव्ह
बीड
बीड शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे कोरोना चे मीटर पळू लागले आहे दोन दिवसातच बीड जिल्ह्यातून 14 रुग्णांची वाढ झाली होती आजही 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत हे बाधित रुग्ण बीड छोटी राज गल्लीतील असून बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येण्याचे प्रमाणही वाढत आहे बीड जिल्ह्यातून एकूण 67 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर त्यामध्ये 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर 63 रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत
कोविड 19-बीड अपडेट – 22/जून/२०२०
आज पाठविलेले स्वॅब – 67
निगेटिव्ह अहवाल – 63
पॉजिटिव्ह अहवाल – 04
प्रलंबित अहवाल- 00
छोटी राज गल्ली, बीड 04 – ३० वर्षे स्त्री, 38, 27 व 10 वर्षे पुरूष