कोरोनाचा कहर कसा थांबणार !कलेक्टर साहेब आता खरी गरज आहे कडक नियमांची

मास्क सक्ती मोडणाऱ्यांना 500 रुपये दंडाची शिक्षा ठेवाच


बीड-जेव्हा एकही रुग्ण बीड जिल्ह्यात नव्हता तेव्हा अख्खा महिनाभर कडक नियम पाळले गेले पुढे बाहेरचे आलेले रुग्ण आढळू लागले आणि बीड जिल्ह्यात कोरोना हातपाय पसरू लागला लॉक डाऊन चे नियम चालू असताना हे नको असे हवे लोकांना सवलती हव्यात थोडी शिथिलता हवी अशा मागण्या पुढे आल्या,नाईलाजाने प्रशासनाला काही गोष्टी वगळाव्या लागल्या पण हे करत असताना रुग्ण वाढीचा धोका होताच आणि तो झालाच,आज शंभरी पार करून कोरोना गल्ली गल्लीत घुसतोय याची साखळी तोडणे आता अवघड होऊन बसले आहे जे प्रशासनाचे नियम आहेत त्यात किती लोक त्याची अंमलबजावणी करतात हे पहिले तर लोकांना कोरोनाचे गांभीर्यच राहिले नाही, सूट दिली म्हणजे सगळीच मोकळीक दिली असा समज होऊन बसला आहे हे असेच राहिले तर येत्या काही दिवसात पुन्हा बीड जिल्हा लॉक डाऊन करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते,कोरोना बरोबर लढायचे आहे की त्याला घरात घ्यायचे आहे याचा कुणीच विचार करताना दिसत नाहीत जे लोक समजदार आहेत ते स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊनच राहत आहेत पण ज्यांना नियमांचे काही देणे घेणे नाही अशांचे काय ?नियमांमध्ये मास्क सक्ती केलेली असताना सर्रास पणे लोक बिना मास्क फिरताना दिसत आहेत एका एका गाडीवर तीन तीन लोक फिरत आहेत,भाजी मार्केट दुकाना आणि हमरस्त्यावर दिवाळी खरेदी सारखी गर्दी दिसू लागली आहे पोलिसांनी काठ्या उगारल्या तर त्यांनाच दोषी धरून त्यांनी खूप मोठे पाप केल्याची ओरड केली गेली अधिकारी काम करत असताना त्यांना दाबदडप होऊ लागली त्यामुळे जे नियम जनतेसाठीच होते त्याकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली तेव्हाच खरा कोरोना शहरात घुसला हे मान्य करायला हवे,मोठं मोठ्या शहरात आज किती भयानक परिस्थिती आहे हे आपण पाहतो ऐकतो तरीही नियमांचे पालन होऊ नये याचे आश्चर्य वाटते,
आज कोरोनाचा आकडा 110 आहे उद्या तो वाढणारच यासाठी जिल्हाधिकारी साहेब आता कुणाच्या मागणीची वाट न पाहता सरळ कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्या,जो व्यक्ती बिना मास्क दिसेल त्याला 500 रुपये दंड जागेवरच ठेवा,साडे सहाच्या पुढे संचारबंदी आहे याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता जो दिसेल त्याला जेल मध्ये टाका मग पहा कोरोनाची साखळी तुटण्यासाठी हे नियम किती महत्वाचे ठरतील,जोपर्यंत दंड किंवा शिक्षा काय असते ते कळणार नाही तोपर्यंत लोकांना याचे गांभीर्य कळणार नाही आणि कोरोनाचा कहर थांबणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!