धक्कादायक:बीड जिल्ह्यात आढळले 9 पॉझिटिव्ह
बीड
काल बीड शहरातील छोटी राज गल्ली भागात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते बीड जिल्ह्यातून एकूण 76 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर त्यामध्ये 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत बीड जिल्हा रुग्णालयातून आज 61 नमुने पाठवण्यात आले होते आढळून आलेले पॉझिटिव्ह रुग्ण बीड शहरातील झमझम कॉलनीतील 2 व शहेनशहा नगर मधील एक तर बशीर गंज भागात चार रुग्ण आढळून आले आहेत बीड शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे तर चिंचपुर तालुका धारूर येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यातही एका बालकाचा समावेश आहे, 76 पैकी 9 पोजिटिव्ह तर 68 जणांचे नमुने निगेटिव्ह आढळून आले आहेत
कोविड १९-बीड अपडेट – २०/जून/२०२०*
आज पाठविलेले स्वॅब – ७७
निगेटिव्ह अहवाल – ६८
पॉजिटिव्ह अहवाल – ०९
२ – २१ वर्षे पुरूष व २२ वर्षे महिला – रा.झमझम कॉलनी, बीड
१ – २६ वर्षे महिला – रा. शहेनशहा नगर, बीड
४ – ४० वर्षे पुरूष, ३४ वर्षे स्त्री, १० वर्षे मुलगा, ७ वर्षे मुलगा – रा.बशिरगंज, बीड
२ – ३१ वर्षे महिला, ८ वर्षे मुलगा – रा.चिंचपूर ता.धारूर (औरंगाबादहून आलेले)