होमिओपॅथीची औषधी घेताय ना मग दिलेल्या सुचना लक्षात घ्या
बीड दि.16(प्रतिनिधी)ः- कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सध्या संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक उपाययोजना करून या महामारीचा मुकाबला केला जात आहे. अशाच काळात होमिओपॅथीच्या अर्सेनिक अल्बम 30 या औषधाने मोठा दिलासा मिळू लागला आहे. मा.जयदत्त क्षीरसागर यांच्या संकल्पनेनुसार प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीड मतदारसंघात एक लाख कुटूंबाना हे औषध दिले जात आहे. मात्र हे औषध घेत असताना प्रत्येकाने दिलेल्या सुचनेनुसारच जर हे औषध घेतले तरच त्याचा खरा फायदा आहेे. याने काय होतय म्हणून मनाप्रमाणे औषधाची मात्रा अधिक घ्यायला जाल तर नको त्या संकटाला सामोरे जावे लागेल तेव्हा औषधाच्या सोबत दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन एसकेएचचे डॉ.अरूण भस्मे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावानंतर देशात यावर अनेक उपाय योजना सुरू असतानाच आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीच्या अर्सेनिक अल्बम 30 मुळे रोगप्रतिकारक शक्ति वाढली जावून कोरोना पासून आपण सुरक्षित राहू शकतो असे सुचवले त्यानंतर देशभरात या औषधीचा वापर सुरू झाला. बीडमध्ये सर्वप्रथम एसकेएच मेडिकल कॉलेजच्या टिमला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी काकू-नाना प्रतिष्ठानच्या वतीने 5 लाख नागरिकांना म्हणजे 1 लाख कुटूंबांना ही औषधी मोफत वाटप करण्याची सुचना केली. त्यानंतर या औषधाची निर्मिती करून जवळपास सर्वच ठिकाणी ती पोहच देखील झाली आहे. आर्सेनिक या औषधाच्या उपयुक्ततेमुळे अणेक सामाजिक संस्था चांगल्या उद्देशाने समाजात आर्सेनिक चे वाटप करीत आहेत,काही लोक स्वस्तात औषधी मिळतात तेथून त्या प्राप्त करतात,त्यामध्ये प्युरीटी असू शकत नाही,सध्याच्या परिस्थितीचा औषधी दुकानदार गैरफायदा घेत आहेत, तर बोगस औषधीचे निर्माते तयार झाले आहेत,काहींनी या औषधांचा फायदा होतो म्हणून रोज घेण्याचा सपाटा लावला,त्यामुळे पुढे जाऊन काही दुर्धर आजार होण्याची शक्यता आहे,आर्सेनिक हे सोमल नावाच्या विषयापासून तयार केले जाते,त्यामुळे त्याची मात्रा व रिपीटेशन डॉक्टरांच्या सल्लेंने घेणे आवश्यक आहे,औषधे लहान मुलापासून दूर ठेवावे,होमिओपॅथीशी दुरान्वयाने ही सम्बध नसलेल्या व्यक्तीकडून औषधी घेऊ नये. काही लोक होमिओपॅथी औषध आहे म्हणून रोजच किंवा वेळी-अवेळी कधी ही ती घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कृपया सर्व नागरीकांना सुचीत करण्यात येते कि आपण औषधासोबत दिलेल्या सूचनेप्रमाणेच हे औषध घ्यायचे आहे. त्याचे सेवण मर्यादीत डोजमधेच घेणे बंधनकारक आहे औषधाची मात्रा ही दिलेल्या वेळेत जेवढी सांगितली तेवढीच घेणे क्रमप्राप्त आहे. कुठलेही औषध हे ठराविक वेळेत व मर्यादेत घेतले तरच ते औषध आहे अन्यथा अधिक प्रमाणात घेतल्यास विषासमान आहे. अधिक मात्रामुळे अन्य त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे दिलेल्या सुचनेनुसारच ही औषधी घ्यावी जेणेकरून त्याचा अधिक फायदा होईल असेही डॉ.अरूण भस्मे यांनी कळवले आहे.