महाराष्ट्रमुंबई

लॉकडाऊन काळात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक

बीडच्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल

मुंबई दि.१६- विविध समाजमाध्यमांचा वापर करून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने कठोर पावले उचलली असून राज्यात सायबरसंदर्भात ४८० गुन्हे दाखल झाले आहेत, २५८ जणांना अटक करण्यात आली असून कोरोना महामारीला जातीय व धार्मिक रंग देऊन टिकटॉकवर व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करणाऱ्याविरुद्ध बीडच्या परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४८० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३२ एनसी आहेत) नोंद १५ जूनपर्यंत झाली आहे. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

व्हॉट्सॲप- १९५ गुन्हे

फेसबुक पोस्ट्स – १९६ गुन्हे दाखल

टिकटॉक व्हिडिओ- २५ गुन्हे दाखल

ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ९ गुन्हे दाखल
इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे

अन्य सोशल मीडिया ( ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५१ गुन्हे दाखल

वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २५८ आरोपींना अटक.

१०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *