बीड

आरटीओ कागदपत्रांची वैधता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत

बीड, दि. 15:- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने गृह मंत्रालय,केंद्र सरकार यांच्या आदेशान्वये संपुर्ण देशामध्ये पुर्णपणे लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलाआहे. सदरच्या कालावधीत वाहतुक करीत असतांना वाहन चालक मालक यांना वाहनासंबंधित कागदपत्रांच्या वैधतेवरुन अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कागदत्रांच्या वैधतेबाबत केंद्र शासनाच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, वाहतुक परवाना, वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती (लायसन्स) वाहन पुर्ननोंदणी व तत्सम कागदपत्रे ज्यांची वैधता 1 फेब्रुवारी नंतर किंवा 30 जून पर्यंत संपुष्टात येणार आहेत अशा सर्व कागदपत्रांची वैधता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वैध धरण्याबाबत सर्व अंमलबजावणी यंत्रणांना कळविण्यात आले आहे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *