परळी शहरात एका भागात तर धारुर तालुक्यातील आंबेवडगावातही संचारबंदी लागू जिल्हाधिकारी राहुल रेखावार
परळीत भीमनगर जगतकर गल्लीत संचारबंदी
बीड
परळी शहरातील जगतकर गल्ली भीम नगर येथील 1रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून सध्या हा रुग्ण औरंगाबाद येथीलरुग्णालयात उपचार घेत आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव इतर ठिकाणी होऊ नये म्हणून परळी शहरातील जगतकर गल्ली भिमनगर मधील सुभाष कसबे यांचे घर ते संतोष आदोडे यांच्या घरापर्यंत कंटेनमेंट घोषित करून याठिकाणी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसेच
धारुर तालुक्यातील आंबे वडगाव येथे कोरोनाविषाणूचा एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आंबेवडगाव हे गाव कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात आले असून या ठिकाणीदेखील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत