पावसाळ्यात कोरोनापासून बचावासाठी या गोष्टी महत्त्वाच्या?
सध्या सर्वजण करोनाशी झुंज देत असतानाच पावसाळा देखील सुरु झाला आहे. असं म्हणतात की पावसाळ्यात करोना विषाणू भरपूर काळ जिवंत राहतो. पण ऋतू कोणताही असो आपण साधव असणं किंवा आपली योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे. म्हणून खाली दिलेल्या टिप्स वापरुन तुम्ही स्वत:चा करोनापासून बचाव करु शकता.
करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला हिवाळा सुरु असताना, अर्थात तेव्हा कोरोनाने भारताला विळखा घातला नव्हता. यामुळे असा समज झाला की करोना हा थंडीत जास्त ताकदवान असतो. पुढे फेब्रुवारी आणि मार्चच्या महिन्यात करोनाने भारतात प्रवेश केला. तेव्हा अनेक जणांनी असं मत मांडलं की भारतात आता उन्हाळा आहे जास्त उष्णता आहे त्यामुळे करोना जास्त वेळ भारतात टिकणार नाही, भारतीयांवर त्याचा काही परिणाम होणार नाही. मात्र झालं उलट! आता मे महिन्यात करोनाने भारतभर काय धुमाकूळ घातला तो आपण पाहिलाच! सर्वाधिक संख्या ही मे महिन्यात वाढली. त्यामुळे कोरोनावर कोणत्या ऋतूचा प्रभाव पडतो या गैरसमजातून आपण बाहेर पडायला हवं आणि कोणताही ऋतू असला तर स्वत:ची शक्य तितकी काळजी घेतली पाहिजे. आता पावसाळा सुरु होतोय आणि तज्ञांच्या मते कोरोना रुग्णसंख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. तर या पावसाळ्यात आपण कोरोनापासून स्वत:चा कसा बचाव करावा याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देतोय!
दमट वातावरणात अधिक सक्रीय राहतो कोरोना विषाणू
करोनाने जगात आपले हातपाय पसरल्यापासून विविध देशांत करोनावर वैज्ञानिक आणि डॉक्टर संशोधन करत आहेत आणि त्या विविध संशोधांतून ही गोष्ट दिसून आली आहे की थंड आणि दमट वातावरणात कोरोनाचे विषाणू अधिक वेगाने हल्ला करतात. या वातावरणात हे विषाणू जास्त काळ सक्रीय राहून अधिक काळ जगतात सुद्धा! हा विषाणू उन्हाळ्यात सुद्धा सक्रीय असला तरी तो उन्हाळ्यात जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. म्हणून मे महिन्यात जरी भारतातील रुग्णसंख्या वाढली असली तरी मृत्यूचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत फार कमी आहे.
पावसाळ्यात पाणी उकळूनच प्या
पावसाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज भासत नाही. पावसाळ्यात आपल्या शरीरातून कमी पाणी बाहेर फेकलं जातं त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी स्थिर राहते. मात्र पावसाळ्यात शरीराची पाण्याची गरज भागवताना एका गोष्टीची काळजी घ्यावी ती म्हणजे पाणी शुद्ध आणि उकळूनच प्यावे. अशुद्ध पाणी तुम्हाला लगेच आजारी करू शकते. त्यात या कोरोनाच्या संकटाच्या काळात तुम्ही अधिकाधिक काळजी घेऊन उकळलेलेच पाणी तुम्ही पिणे उत्तम!
घराच्या आसपास स्वच्छता ठेवा
कोरोना विषाणू हा कुठूनही कसाही तुमच्या पर्यंत पोहचू शकतो आणि तुम्हाला विळखा घालू शकतो. यासाठी आता केवळ स्वत:ची नाही तर संपूर्ण घराची आणि आसपासच्या परिसराची सुद्धा स्वच्छता राखा. सर्व गोष्टी जमल्यास सॅनीटाइझ करा. घरच्या आवारात अडगळ असेल तर योग्य सुरक्षा राखून ती अडगळ साफ करा. आठवड्यातून किमान २-३ वेळा तरी घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा. असं केल्याने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा बसेल.
योग्य आहार घ्या
पावसाळ्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती बदलत्या वातावरणामुळे कुठेतरी कमजोर पडते. तिला पुन्हा सक्षम बनवण्यासाठी आपण योग्य आहार घेतला पाहिजे. हा आहार पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण असायला हवा जेणेकरून तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढेल. थंड पदार्थ आणि पेये घेणे टाळा, यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती अधिक कमजोर पडत जाईल. घरचे सात्विक अन्न खाण्यावर भर द्या. पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे काही काळ बंद करा. यामुळे करोनापासून तर तुमचा बचाव होईलच, पण सोबत अन्य आजारांपासून सुद्धा तुम्ही दूर राहाल.
शक्य तितके घरात राहा
पावसाळा आला म्हणजे करोना कमजोर होईल आणि आपण बिनधास्त बाहेर फिरू शकू या अविर्भावात राहू नका. उलट या काळात शक्य तितके घरात राहा. तुम्ही घरात जास्त सुरक्षित आहात. पावसाळ्यात वाहत्या पाण्यासोबत अनेक गोष्टी वाहून येतात. या वस्तूंमध्ये, कचऱ्यामध्ये करोना विषाणूचे संक्रमण अडकलेले असू शकते. अशा वस्तू तुमच्या संपर्कात आल्याने तुम्हाला कोरोनाची बाधा होऊ शकते. म्हणून शक्य असेल तर घरीच राहा. गरजेचे काम असेल तर स्वत:च्या शरीराला योग्य सुरक्षा देऊन मगच बाहेर पडा. अशाने तुम्ही स्वत: सुरक्षित राहाल आणि आपल्या कुटुंबीयांनाही सुरक्षित ठेऊ शकाल.(जनहितार्थ)