आज पाठवलेल्या 66 पैकी 65 निगेटिव्ह तर एक प्रलंबित
बीड जिल्ह्यातून आज 66 जणांचे स्वॅब तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते त्यात 65 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर एकाचा अहवाल अनिर्णित आहे 66 पैकी 40 अहवाल हे धारूर कडील होते तेही निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे
धारूर येथील” त्या” कोरोनाबाधीताच्या संपर्कातील 40 व्यक्तीचे स्वॅब नमुने आले निगेटिव्ह.
धारूर येथील ” त्या ” कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व कुटूंबियातील 40 व्यक्तीनां मंगळवारी दुपारी स्वॅब घेण्यासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात 22 जणांना तर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात 18 जणांना पाठविण्यात आले होते. 24 तासानंतर या स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून सर्व 40 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती धारूर तालुका आरोग्य आधिकारी डाॅ सचिन शेकडे यांनी दिली आहे.