गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे पूर्णवेळ संचारबंदी लागू–जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड, दि.03 :-गेवराई तालुक्यातील सिरसदेवी कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला १ रुग्ण आढळून आला आहे यामुळे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .
याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला १ रुग्ण आढळून आल्याने या गावामध्ये कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित
कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३०जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच
सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.
000