ऑनलाइन वृत्तसेवा

प्रतीक्षा संपली;तारीख ठरली:दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याची अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे.

यंदाच्या वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आता उद्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. १३ मे रोजी दुपारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर लॉगिन करून आपला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि ssc.mahresults.org.in या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहे. या वेबसाईटवर निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे.

दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *