ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

पाकिस्तानी सैन्याचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त;पाकिस्तानी पंतप्रधानांवर बंकरमध्ये लपून बसण्याची वेळ

अवघ्या तीन तासांमध्ये भारतीय सैन्याने (Indian Army) अभूतपूर्व अशी कारवाई करत पाकिस्तानला नाक घासायला भाग पाडले आहे. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम आणि अँटी एअरक्राफ्ट गन्सनी पाकिस्तानचे ड्रोन हल्ले आणि रॉकेट हल्ले परतावून लावले. तर एस-400 डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानने (Pakistan Army) डागलेली तब्बल 50 क्षेपणास्त्रे पाडली होती. याशिवाय, पाकिस्तानी लष्कराचा रुबाब असलेली एफ 16 आणि जेएफ 17 विमानेही भारतीय सैन्याने पाडली होती. यानंतर भारतीय लष्कराच्या वायूदल, नौदल आणि पायदळाने धडाकेबाज कारवाई करत पाकिस्तानला लोळण घ्यायला भाग पाडले आहे.

भारतीय वायूदलाने पाकिस्तानमधील तब्बल 15 शहारांवर हल्ले चढवले आहेत. इस्लामाबाद, लाहोर आणि क्वेटा याठिकाणी जोरदार स्फोट होताना पाहायला मिळत आहेत. तर भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर युद्धनौकेने कराची बंदर उद्ध्वस्त केले. तर भारतीय लष्कराने सीमारेषेवर पाकिस्तानी चौक्यांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. एवढेच नव्हे तर बलोच आर्मीही पाकिस्तानवर तुटून पडली आहे. क्वेटामध्ये बलोच आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरु केले आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयावर हल्ला चढवला आहे बलोच आर्मीने पाकिस्तानी सैन्याचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे भारतावर अणुबॉम्ब टाकण्याच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तान अवघ्या तीन तासांत धराशाही झाला आहे.

इस्लामाबादमध्ये भारतीय वायूदलाकडून हवाई केले जात आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून काही अंतरावर स्फोट झाला होता. त्यामुळे पाकिस्तानी पंतप्रधानांवर बंकरमध्ये लपून बसण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानी लष्करप्रमुखांची अब्रू गेली, देशद्रोहाचा खटला चालणार?

पाकिस्तानी सैन्याने भारतावर केलेल्या हल्ल्याचे दुष्परिणाम आता त्यांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये यादवी संघर्ष सुरु झाला आहे. प्रशासक आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्यानंतर भारतावर हल्ल्याचे आदेश देणारे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर आता देशद्रोहाचा खटला चालवण्यात येणार आहेत. त्यांच्या जागी आता शमशाद मिर्झा हे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *