बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ

मुंबई प्रतिनिधी । बी.एड आणि एम.एड साठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बी.एड. आणि एम.एड. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करण्याची तारीख सीईटी सेलकडून वाढवण्यात आली आहे.

या मुदतवाढीनुसार आता बी.एडला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी शुक्रवारपर्यंत तर एम.एडला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी बुधवारपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. सीईटी सेलकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे बी.एड आणि एम.एडच्या प्रवेश प्रक्रियेत मिळालेली मुदतवाढ विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.


error: Content is protected !!