केजबीड

वाल्मिक कराड याच्यावर मकोका;ताबा मिळावा यासाठी सीआयडीचा अर्ज दाखल

वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे,दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर आता सीआडीने कोर्टात अर्ज केला आहे. सीआयडीने खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे. त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी विनंती सीआयडीने केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला सीआयडीच्या ताब्यात देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर संतोष देशमुख मर्डर प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहे. त्यामुळे संतोष देशमुख मर्डर प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का? याचा तपास सीआयडीला करायचा आहे. आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा तपास करायचा आहे, असं एसआयटीने कोर्टात म्हटलं आहे. त्यामुळे आता कोर्ट का निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वाल्मिक कराड याला मकोका लागल्याचे समजल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. त्यांनी सकाळपासूनच तीव्र आंदोलन केले होते. समर्थक आता आक्रमक झाले आहे. त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे. आज वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा पोलीस ठाण्याबाहेर त्यांना सोडवे यासाठी ठिय्या आंदोलन केले. शहरातील विविध दुकानं आणि आस्थापनं बंद करण्यात आली आहे. परळीचे सर्व व्यवहार हे ठप्प झाले आहेत.

मकोका बाबत फक्त अर्ज आला-ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे

आज केवळ खंडणी प्रकरणात दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. कुठे ही तपासात वाल्मिक कराड यांचा कुठलाही सहभाग नाही असा युक्तीवाद कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. त्यांच्यावर मकोका लावण्याचा कोणताही युक्तीवाद झाला नसल्याची माहिती ॲड ठोंबरे यांनी दिली.

आज कोर्टापुढे युक्तीवाद झाला. त्यांनी १० मुद्द्यावर पोलीस कोठडी मागितली. दहा दिवसाची कोठडी मागितली होती. त्या आधीच्या वेळीही पोलीस कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयीन कोठडी लावण्यात आली आहे. मकोका लावण्यात आल्याचं आमच्यासमोर काही आलं नाही. आज फक्त खंडणीचं प्रकरण होतं. मकोकाचा अर्ज आलेला नाही. आम्ही पुढच्यावेळी सांगू. आतापर्यंत तपास आला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात तपास करायचं आहे, असं पोलिसांनी सांगितलं. गुन्ह्यता कराड याचा सहभाग दिसून आला नाही. पोलिसांनी परत दहा दिवसाचा कोठडी मागितली.

आम्ही जामिनाचा अर्ज केला आहे. दोन चार दिवसात सुनावणी होणार आहे. मकोकाची प्रक्रिया वेगळी आहे. सरकारी वकिलाचे नवीन मुद्दे काही नव्हते. त्यांनी कुठे कुठे मालमत्ता घेतली, ॲट्रोसिटी वगैरे मुद्दे मांडले. त्यांनी अनेक मुद्दे मांडले. पण कोर्टाने सर्व मुद्दे ग्राह्य धरले नाही, असे ॲड. ठोंबरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *