ऑनलाइन वृत्तसेवा

महागाई भत्त्यात वाढ कधी जाहीर होणार?सरकारी कर्मचारी,पेन्शनधारकांना किती मिळणार महागाई भत्ता?

2025 हे वर्ष प्रत्येकासाठी काही ना काही खास घेऊन आले आहे. यामुळे सर्वांच्याच आयुष्यात काही ना काही बदल पाहायला मिळतायत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्ष म्हणजे 2025 मध्ये आनंदाची बातमी मिळू शकते.

कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यासंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक ज्या वेळेची गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते ती वेळ आता जवळ आली आहे. सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 2025 मध्ये (DA) वाढ लवकरच जाहीर केली जाऊ शकते. पण हा महागाई भत्ता नेमका कसा मोजला जातो? तो कधी जाहीर केला जाऊ शकतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

महागाई भत्ता कसा मोजला जातो?

7व्या वेतन आयोगाअंतर्गत, AICPI (ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स) च्या आधारे महागाई भत्त्याची गणना केली जाते. AICPI निर्देशांक जुलै ते डिसेंबर 2024 चा डेटा सरकार DA किती वाढवणार? हे ठरवेल.ऑक्टोबर 2024 पर्यंत जारी केलेला डेटानुसार, जानेवारी 2025 मध्ये DA मध्ये 3 टक्के वाढ होऊ शकते. कारण त्यावेळी AICPI 144.5 वर होता. मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. या दोन महिन्यांतही हा आकडा 145 च्या आसपास राहिला तर जानेवारी 2025 मध्ये डीए 56 टक्क्यांपर्यंत वाढेल.

कर्मचाऱ्यांना किती फायदा होईल?

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा निर्णय प्रामुख्याने AICPI (ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स) वर आधारित असतो. गेल्या महिन्यांतील आकडेवारीवरून पाहता नवीन वर्षात सरकार डीए 53 टक्क्यांवरून 56 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. महागाई भत्त्यात ही 3 टक्के वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय वाढ करू शकते. डीएमध्ये 3 टक्के वाढ झाल्यास सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पैशात मोठा बदल होणार आहे.

महागाई भत्त्यात वाढ कधी जाहीर होणार?

डीए वर्षातून दोनदा अपडेट केला जातो. 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत पहिल्यांदा जानेवारीत आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये डीए अपडेट होतो. ही पुनरावृत्ती AICPI निर्देशांकाच्या सरासरीवर आधारित आहे. या वेळी जानेवारी 2025 ची DA सुधारणा जुलै ते डिसेंबर 2024 मधील AICPI डेटावर आधारित असेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची औपचारिक घोषणा मार्चमध्ये होते. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होळीपूर्वी ते सोडवून सरकार सणाची भेट देऊ शकते. असे असले तरी डीएचे पैसे मार्च किंवा एप्रिलच्या पगारासह येऊ शकतात, याची कर्मचाऱ्यांनी नोंद घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *