राज्यातील सरपंचांना मिळणार ५० लाखांचे विमा कवच-काकडे

राज्य परिषद मुंबई महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मांडला मुद्दा
मुंबई, दि: २ – २९ मे च्या शासन निर्णयामध्ये राज्यातील सरपंचांच्या विमाकवचाबद्दल काहीही उल्लेख नव्हता. त्या बद्दल सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषद पदाधिकरी सर्वश्री महिला अध्यक्ष राणीताई पाटील ,महिलाराज्य उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात, अविनाश आव्हाड, जितेंद्र भोसले, शिवाजी आप्पा मोरे, आनंद जाधव, राजाराम पोतनीस, गोविंद माकने,किसन जाधव, धनराज पाटील,गोविंद भवर,हनुमंत जाधव,कविता घोडके पाटील,शिरीष पाटील,रामराजे जाधव, आजिनाथ देशमुख ,माऊली वायाळ ,पांडुरंग नागरगोजे, सागर माने, सुधिर पठाडे , नारायण वणवे ,संभाजी सरदेसाई ,दासराव हंबर्डे,गोपाळ पाटील इजळीकर, किसन जाधव ,संजय सावंत, कमलेश कोरपे ,कौसरताई जहागीरदार , आबासाहेब सोनवणे, अलंकार काकडे , राम पाटील , किशोर गणवीर,या सह जिल्हा ,तालुका पदाधिकारी राज्यातील तमाम आजी माजी सरपंच,आजी माजी उपसरपंच राज्यातील सरपंचांना ५० लाख रुपयाचा विमा देण्यात यावा अशी मागणी दिनांक २९.३.२०२० रोजी जा क्र /स प मु म /१२५ या पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार ,ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांच्याकडे केली होती याची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा घडवून आणत याबद्दल मागणी केली.
या विमा कवचाचा फायदा राज्यातील २७५०० सरपंचांना मिळणार आहे. प्रत्येक गावातील सरपंचां चा ५० लाख रुपयांचा विमा या माध्यमातून निघणार आहे. ग्रामीण भागामध्ये सरपंच हे सध्याच्या कोरोना च्या लढाईत अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहेत. ते आपल्या जीवाची पर्वा न करता कृती समिती अध्यक्ष म्हणून गावातील नागरिकांची काळजी आणि सुरक्षितता जपत आहे. त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असे आज. सामंत म्हणाले.
सामंत म्हणाले, सरपंचांच्या विमाकवचाबद्दल मुख्य सचिव अजोय मेहता हे सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश देणार आहेत. अनिल गितेपाटील ,प्रदेश उपाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र अँड.विकास जाधव- प्रदेश सरचिटणीस सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!