कर्जाचे हप्ते थांबवू नका फायद्या ऐवजी तोटाच;कुठलीही बँक व्याज सोडणार नाही

EMI पुढे ढकलताय, फायद्या ऐवजी होऊ शकते नुकसान; जाणून घ्या ३ पर्याय!

नवी दिल्ली:करोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊनमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ईएमआय देण्यासाठीचा कालावधी आणखी ३ महिन्यांनी वाढवला आहे. याचा अर्थ जर तुम्ही गृहकर्ज किंवा गाडीसाठी कर्ज घेतले असेल तर त्याचा हप्ता तीन महिने टाळू शकता. ही सुविधा ऑगस्टपर्यंत मिळेल. RBIने याआधी मार्च ते मे महिन्यापर्यंत अशी सवलत दिली होती. पण बँक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ही सवलत बाहेरून जितकी चांगली वाटत तितकी चांगली नाही. जाणून घेऊयात याबद्दल…

किती फरक पडणार?
तुम्ही आणखी ३ महिने EMI देण्याचे टाळू शकता. यामुळे बँकेचे काहीच नुकसान होणार नाही. बँकेने तुमचा हप्ता तीन महिन्यांनी पुढे ढकलला तरी त्यावरील व्याज मात्र ते घेणार आहेत. त्यामुळे EMI दिला नाही तर त्यावरील व्याज द्यावे लागेल. त्यामुळे हे समजून घेणे गरजेचे आहे की EMI टाळणे किती गरजेचे आहे. जर नसेल तर EMI दिलेला बरा. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील. स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार मार्च ते मे या काळात EMI न भरण्याची सवलत फक्त २० टक्के ग्राहकांनी घेतली आहे. याचा अर्थ अधिकतर ग्राहक EMI देत आहेत.

EMI द्यावा की नको यासंदर्भात वारंवार काही प्रश्न विचारले जात आहे. ज्या कर्जदारांच्या उत्पन्नावर काहीच फरक पडला नाही त्यांनी EMI दिलेला बरा, असा सल्ला इंडियन बँक असोसिएशनने दिला. तुमचे उत्पन्न खरच कमी झाले असेल तर या सवलतीचा फायदा घ्यावा. पण त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ऑगस्टपर्यंत काहीच द्यावे लागणार नाही. नंतर मात्र सहा महिन्याचे व्याज द्यावे लागेल.
बँका देत आहेत हे तीन पर्याय
१) सवलतीच्या काळात हाप्ते द्यावे लागत नाहीत पण त्यावरील व्याज द्यावे लागते. ऑगस्टनंतर सहा महिन्याचे व्याज ग्राहकांना द्यावे लागेल. उदा- एखाद्याने २९ लाख रुपयाचे कर्ज २० वर्षासाठी घेतले असेल तर त्याला २५ हजार २२५ इतका EMI द्यावा लागतो. या व्यक्तीने EMI टाळला तर ती रक्कम होते १ लाख ५१ हजार ३५० रुपये. या रक्कमेवर बँक त्याच्याकडून ५ ते ७ टक्के इतके व्याज घेईल. ७ टक्के व्याजाने ही रक्कम १ लाख ६१ हजार ९४४ रुपये इतकी होते.
२) कर्जाचा कालावधी न वाढवता ते सहा EMI सोबत जोडले तर… अशा परिस्थितीत २९ लाख रुपयाचे कर्ज २० वर्षासाठी घेतले असेल तर त्याचा EMI २५ हजार २२५ इतका होतो. संबंधित कर्जदाराने १२ EMI दिले असेल तर २८८ EMI शिल्लक राहतात. त्याने सहा महिन्याचे EMI भरले नाही तर त्यानंतर २५ हजार २२५च्या ऐवजी २५ हजार ६५० रुपये EMI होईल. याच कर्जाचा कालावधी तोच राहील.
३) EMI न वाढवता कर्जाचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत २९ लाख रुपयाच्या २० वर्षासाठीच्या कर्जावर संबंधित व्यक्तीने सहा महिन्यासाठी EMI दिला नाही तर त्याचे सात EMI वाढवले जातील. यात EMIवरील सहा महिन्याच्या व्याजाचा देखील समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!