देशमहाराष्ट्र

येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होणार : नितीन गडकरी

राजकारण आपल्या जागी आणि आता आलेलं हे संकट आपल्या जागी आहे. हे संकट गंभीर आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी कुठलेही राजकीय मतभेद नाहीत.

नागपूर : सार्वजनिक वाहतुकीबाबत एक महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होणार असल्याचं गडकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता घोषित केलेल्या पहिल्या लॉकडाऊनपासून सार्वजनिक प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना मंत्री गडकरी म्हणाले की, आता सार्वजनिक प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होईल. दुकानं देखील हळूहळू सुरु होत आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यासाठी काही गाईडलाईन बनवण्यावर विचार सुरु आहे. आमचा विभाग या गाईडलाईन्सचं पालन करेन, असं देखील गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *