बीड जिल्ह्यात 30 रुग्णांनी केली कोरोनावर मात
बीड
बीड जिल्ह्यात कोरोनावर मात करून 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर आज परत 15 रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी जात आहेत आता एकूण बीड जिल्ह्यातून कोरोना मुक्त झालेल्या लोकांची संख्या 30 झाली आहे तर माजलगाव,केज, गेवराई कोरोना मुक्त झाले आहेत.त्यामुळे बीड जिल्ह्या कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे उपचार घेणाऱ्या पेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे ही दिलासादायक गोष्ट आहे
बीड जिल्ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला होता तर एक जण बरा होऊन घरी गेला होता कालच 15 जण कोरोना मुक्त झाले तर 6 रुग्णांना पुण्याला पाठविले होते त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 41 रुग्णावर उपचार सुरु होते.
यातील माजलगाव तालुक्यातील व बीड शहरातील रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने घरी पाठविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आर बी पवार यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत ही समाधानाची गोष्ट आहे आरोग्य विभागातील डॉक्टर नर्स आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीने यश मिळू लागले आहे