देशनवी दिल्ली

पाचव्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू काय बंद;निर्णय राज्य सरकार ठरवणार

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा केलीय. कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. १ जूनपासून हे दिशानिर्देश लागू होतील ते ३० जूनपर्यंत कायम असतील. नंतर कंटेन्मेंट झोनमध्येही टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोन बाहेरचा भाग आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांनुसार खुला करण्यात येईल. कंटेन्मेंट झोनमध्ये नियमानुसार सर्व बंद राहील. पण कंटेन्मेंट झोनच्या बाहेर सर्व काही गोष्टी हळूहळू खुल्या केल्या जातील. लॉकडाऊन अनलॉक करताना सरकारने त्यासाठी तीन टप्पे जाहीर केले आहेत. ते पुढील प्रमाणे….
अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात ८ जूनपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल सुरू होतील. यासह धार्मिक स्थळंही सुरू करण्यात येतील. पण यासाठी अटी लागू करण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात शाळा, कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्था उघडतील. सरकारी शाळा आणि विद्यार्थ्यांचा पालकांशी संवाद साधून राज्य सरकारांना निर्णय घेता येईल. जुलैपासून शाळा, कॉलेजेस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण शाळा सुरू करायच्या की नाही याचा निर्णयही राज्य घेऊ शकतात.
तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणं, मेट्रो रेल्वे, चित्रपटगृह, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, बार आणि ऑडिटोरियम, असेंबली हॉल अशी ठिकाणी उघण्याबाबत विचार केला जाईल.
रात्रीची संचारबंदीही सुरूच
रात्री ९ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. आतापर्यंत रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी कमी करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज आणि शिक्षणसंस्था सुरू करण्याबाबत सरकार नंतर दिशानिर्देश जारी करणार आहे.
८ जूनपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल्स सुरू होणार

मंदिर, मशिद, गुरुद्वारा आणि चर्च सुरू करण्यात येतील. अनेक राज्यांनी मॉल सुरू करण्याची मागणी केली होती. मॉलही टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. शाळा, कॉलेज दुसऱ्या टप्प्यात उघडण्याची शक्यता आहे. तर ८ जूनपासून शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटही सुरू करण्यात येतील. पण सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक असेल. धार्मिक स्थळांसह सलूनही सुरू होतील. पण त्यासाठी अटी लागू केली जातील. त्यांचे पालन करावे लागेल. पण राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
कुठेही जाता येणार
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. राज्यातही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. तसंच कुठही येण्या-जाण्यासाठी आता कुठलीही परवानगीची घ्यावी लागणार नाही.
राज्यांकडे अधिक अधिकार
राज्यांना केंद्र सरकारने जास्त अधिकार दिले आहेत. बस, मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा आहे. केंद्र सरकारने बंदी हटवल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *