बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी डिसेंबरमध्ये
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती नव्याने स्थापित ग्रामपंचायत समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमध्ये वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणक प्रणालीद्वारे राबवण्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे गरजेचे असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे त्यामुळे राज्यातील 340 तालुक्यातील 7751 ग्रामपंचायत साठी निवडणुकीचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे निवडणुका असलेल्या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असून या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती घोषणा मंत्री खासदार आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही
बीड जिल्ह्यातील
अंबाजोगाई तालुक्यातील 83 आष्टी तालुक्यातील 109 बीड तालुक्यातील 132 धारूर तालुक्यातील 31 गेवराई तालुक्यातील 76 केज तालुक्यातील 66 माजलगाव तालुक्यातील 44 परळी तालुक्यातील 80 पाटोदा तालुक्यातील 34 शिरूर तालुक्यातील 24 वडवणी तालुक्यातील 25 ग्रामपंचायत साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे
बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायत साठी डिसेंबर मध्ये मतदान होणार आहे