बीड

बीड जिल्ह्यात लाखो मुस्लिम महिला रस्त्यावर:ऐतिहासिक मोर्चातून दाखवले एकीचे बळ

बीड मध्ये गुरूवारी (दि. 15 सप्टेंबर) रोजी आयोजित मोर्च्यात मुस्लिम महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली. किल्ला मैदान येथून रख रखत्या उन्हात निघालेला हा मोर्चा दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती पाहुन प्रशासनाला धडकी भरली. जिलाधिकारी यांच्यावतीने उपजिलाधिकारी यांनी आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारले.

देशभरात अल्पसंख्यांक समाजाला या ना त्या कारणावरून टार्गेट केले जात आहे. मुस्लिम धर्माचे प्रेषित पैगंबर यांच्याबाबत अपशब्द काढून मुस्लिमांच्या भावना चिरडल्या जात आहेत. अखंड भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षात संविधानाला मुठमाती देत सरकार हत्या आणि बलात्कार करणा-यांची बाजू घेत त्यांची शिक्षा माफ करत आहेत. नुकतेच 15 ऑगस्ट रोजी गुजरात दंगा प्रकरणातील पीडीत बिलकिस बानो प्रकरणातील सर्व 11 आरोपींची शिक्षा माफ करीत त्यांना सोडून देण्यात आले.

आसाम मधील तीन मदरशांवर बुल्डोजर फिरविण्यात आले. आजान, हिजाब प्रकरणावरून देशात दोन समाजाची मने कलुषित करण्याचे प्रकार होत आहे. या व अन्य कारणावरून अल्पसंख्यांक समाजाला हेतु पुरस्सर टार्गेट केले जात आहे. केंद्र सरकार व अन्य राज्य सरकारांच्या मुस्लिम विरोधी धोरणाविरोधात महिलांचा संविधान बचाव मूक मोर्चा काढण्यात आला.

बीड शहरातील ऐतिहासिक किल्ला मैदान (जामा मस्जीद परिसर) येथे महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या. हा मोर्चा किल्ला मैदान येथून निघून कारंजा रोड, राजुरीवेस, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला. मुस्लिम महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर पाच विद्यार्थीनींनी मोर्चाला संबोधित केलं. भारत देश सर्व धर्मियांचा आहे, गंगा-जमुना तहजीबनं हा देश चालतो, संविधानाने चालतो. एक देश म्हणून बिल्किस बानो च्या आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, असं यावेळी आंदोलनकर्त्या महिला म्हणाल्या.

गेल्या काही वर्षांपासून सर्वसमावेशक असलेल्या अखंड भारतात थेटपणे धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी कामांना अंजाम देण्याहेतू मुस्लिम समाजाला टार्गेट करत कधी लोकांवर हल्ले करतात तर कधी मुस्लिम धर्माचे सर्वस्व मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपमानजनक टिपणी करत आपली विकृती समाजासमोर आणतात. अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करा, बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची माफ केलेली शिक्षा रद्द करून त्यांना पुन्हा जेल मध्ये पाठवा, बलात्काराच्या घटनांना आळा घाला, बलात्काºयांना फाशी द्या, मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मागे घेत त्यांची सुटका करा, आसाममध्ये होत असलेल्या मदरशाविरूद्ध कारवाई तात्काळ थांबवा, पाडलेले मदरसे पुन्हा बांधा, अल्पसंख्याक समाजावर होत असलेले हल्ले, अन्याय पाहता अ‍ॅट्रॉसिटीसारखा कायदा करा, अशा महत्वपुर्ण मागण्यांच निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

बीड शहरात आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठी खबरदारी घेतलेली होती.

ईशनिंदा विरोधी कायदा करण्याची मागणी
जिल्हाभरात जनआक्रोश ! मुस्लीम महिलांचा अंबाजोगाईतील रस्त्यांवर उतरून मूक आक्रोश!
अंबाजोगाई ः बिलकीस बानो यांच्यावर सामुहिक अत्याचार करून त्यांच्या कुटुंबियांची हत्या करणार्‍या नराधमांची माफी रद्द करा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या, तसेच ईशनिंदा विरोधी कायदा करा अशी मागणी करत अंबाजोगाईत महिलांचा प्रचंड मोठा मूक मोर्चा निघाला. मुस्लीम महिला आणि मुलींच्या पुढाकारातून अंबाजोगाईच्या इतिहासात प्रथमच महिलांचा एवढा मोठा मोर्चा निघाला. अतिशय शांततेत आणि शिस्तीत पार पडलेल्या या निषेध मोर्चात सर्वच वयोगटातील महिलांसह विद्यार्थिनी विविध फलक आणि काळे झेंडे फडकावत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
बिलकीस बानो अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींची गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार गत महिन्यात स्वातंत्र्यदिनी सुटका करण्यात आली. एवढ्या नृशंस घटनेतील दोषींना मुक्त करण्यात आल्याने आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणार्‍या व्यक्तींवर कसलीही कारवाई झालेली नसल्याने मुस्लीम समाजात प्रचंड रोष आहे. याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि.15) अंबाजोगाईत मुस्लीम महिलांनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढला. अतिशय नियोजनबद्ध आणि शांततापूर्ण पद्धतीने पार पडलेल्या या मोर्चात सर्वच वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला. विशेषतः विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. सदर बाजार भागातील शादीखाना येथून मोर्चाला सुरुवात झाली. गवळीपुरा, मंडी बाजार, पाटील चौक, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर छोटेखानी सभेत झाले. यावेळी महिला प्रतिनिधींनी मुस्लीम समाजावर होणार्‍या अन्यायाबाबत रोष व्यक्त केला व धर्म, जात पाहून न्यायनिवाडा करण्यात येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

बीड (प्रतिनिधी)
नबी के शान मे गुस्ताखी बर्दाश नहीं करेंगे, लढ बिलखीस लढ, सारा जहाँ तेरे साथ है, हत्यारो और बलात्कारींयोका संरक्षण बंद करो, दोषीयोंको माफी-खुली नाईन्साफी, मौलाना कलिम सिद्दीकी यांची सुटका करा,एकता ही देश की तकदीर है अशा घोषवाक्यांचे फलक हाती घेवून बीड शहरातील मुस्लिम महिला प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. एका बहिणीसाठी हजारो बहिणी पहिल्यांदाच रस्त्यावर दिसून आल्या. हातात काळे झेंडे, प्रचंड शिस्त मोर्चात पहायला मिळाली. मोर्चा मुक होता मात्र भावना किती तिव्र आहे हे महिल्यांच्या गर्दीवरून स्पष्ट झाले. अगदी तीन महिन्याच्या लहान बाळासह ऐंशी वर्षाच्या वृध्द महिला , दिव्यांग महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे एक टोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होते तर दुसरे टोक मिल्लीया महाविद्यालयाच्या प्रांगणासमोर होते. मिल्लिया कॉलेज-बलभीम चौक- कारंजा- राजुरीवेस- बशिरगंज चौक- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. व्यासपीठावर उपस्थित पाच विद्यार्थींनी, वकिल महिला आणि शिक्षिका या सात जणांनी महिला आंदोलकांना संबोधित केले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी स्वत: व्यासपिठावर येवून मोर्चेकरी महिलांचे निवेदन स्विकारले. दरम्यान महाराष्ट्रात प्रथमच मुस्लिम महिला प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. बुरख्यात असणारी महिला बाहेर पडेल का? या प्रश्नाला सणसणीत चपराक देत ‘जुल्म के खिलाफ रास्ते पे उतरंगे तो हमभी किसीसे कम नही’,हे आजच्या मोर्चातुन बीडमधील मुस्लीम महिलांनी दाखवून दिले. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये इतर समाजातील महिला भगिणी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बिलकिस बानो प्रकरणात दोषी ठरवलेल्या आकरा जणांची माफी रद्द करून त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकावे, मौलाना कलिम सिद्दीकी यांना बनावट आरोपांवरून अटक केली असून त्यांची सुटका करावी आणि अल्पसंख्यांकावरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा लागू करावा या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

माजलगाव ।प्रतिनिधी
गुजरातमधील बिलकिस बानो या गरोदर महिलेवर अत्याचार करून तिचा व तिच्या कुटूंबीयांचा खुन करणा-या आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी यासह विवीध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने विराट महिलांनी मुक मोर्चा दि. 15 सप्टेंबर गुरूवार रोजी काढुन उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांना निवेदन देउन राष्ट्पतींकडे मागणी केली आहे.
गुजरातमधील बिलकिस बानो या गरोदार महिलेवर अत्याचार करून तिचा कुटूंबीयांचा खुन करण्यात आला होता. या आरोपींना गुजरात सरकारने शिक्षा माफ करून तुरूंगातुन सोडले आहे. ती शिक्षा माफ न करता त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कायद्याचे योग्य प्रक्रियेचे पालन न करता आसाम मधील तीन मदरशे पाडले ,मौलाना कलीम सिदिक्की यांना बनावट आरोपावरून आटक करण्यात अशा विविध न्याय मागणीसाठी माजलगावात संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने सकाळी 11.30 वाजता बुखारी शाळा जुना बाजार रोड येथुन महिलांचा हातात काळे झेंडे घेउन विराट निषेध मुक मोर्चा आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर अत्यंत शांततेत व शिस्तप्रिय महिलांचा एैतिहासिक मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे रूपांत जाहिर सभेत झाल्यानंतर यावेळी महिला प्रतिनिधींनी घटनेचा निषेध करून उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी निलम बाफणा यांनी मोर्चेकरांच्या स्टेजवर जाउन निवेदन स्विकारले. या मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष सहाल चाउस, मुजम्मील पटेल, नासेरखाँ पठाण, सय्यद नुर, इद्रिस पाशा, गुड्डु खतीब, राजु कुरेशी, शेख शौकत, फेरोज इनामदार, सय्यद सलीम, तालेब चाउस, शेख इमरान, आसेफ हारून, सय्यद रफिक, शेख शायद, रफिक मुन्नुमिया, सुलतान आयुब, नयुम चाउस, नसरोदिन काझी, शेख सादेक ,लतीफ शेख, आदींनी नेतृत्व केले. या मोर्चात महिला, मुस्लिम तरूण सहभागी झाले होते तर पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, यांनी पोलिस संरक्षण दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *