राणा दाम्पत्यांना न्यायालयाचा दणका:FIR रद्द करण्याची याचिका फेटाळली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. दोन वेगळ्या घटना असल्यामुळे गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. मात्र दुस-या एफआयआरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणं आवश्यक आहे, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. तर 353 गुन्ह्यात राणा दाम्पत्यांना दिलासा मिळाला आहे. एफआयआरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणं गरजेचं आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपल्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याच्या मागणी करणारी याचिका न्यायालयात सादर केली होती. न्यायमुर्ती वराळे आणि मोडक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमुर्तींनी राणा दाम्पत्यांची चांगलीच कानउघडणी केली.
जर तुम्ही लोकप्रतिनिधी असाल तरी आपल्या विरोधकांशी आदरात्मक विरोध असावा. आम्ही याबद्दल आमचं मत एका प्रकरणात व्यक्त केलं होतं. पण हे सर्व बहिऱ्या कानावर पडत आहे हे दुर्दैव आहे, अशी तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायमूर्तींनी राणा दाम्पत्यांना चांगलेच सुनावले.