क्षीरसागर बंधूंचा जनसागर:खऱ्या अर्थाने योगेश पर्वास प्रारंभ
शहराचं आणि जिल्ह्याच भवितव्य उज्वल करण्यासाठी समर्थ साथ द्या-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी
पाच जणांच्या प्रवेशाने आपली टीम मजबूत झाली आहे,आता कोणाच्या विकेट घ्यायच्या त्या घ्या मैदान मोकळं आहे अस म्हणत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देर आये पर दुरुस्त आये असे सांगून बीड शहराचे आणि जिल्ह्याचे भवितव्य घडवण्यासाठी समर्थ साथ द्या असे आवाहन त्यांनी केले,अमर नाईकवाडे यांच्यासह फारूक पटेल,बाबूसेठ लोढा,गंगाभाऊ घुमरे,नितीन लोढा या पाच जणांच्या शिवसेना प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.व्यासपीठावर माजी खा चंद्रकांत खैरे,आनंद जाधव,जिल्हाप्रमुख अनिल जगताप,आप्पासाहेब जाधव,नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बशीरगंज भागात आयोजित भव्य प्रवेश सोहळ्यात बोलताना माजीमंत्री क्षीरसागर यांनी राजकारणात चढउतार येत असतात,काही लोक अपघाताने पदावर येतात,मात्र ज्या चूका झाल्या त्या दुरुस्त करण्याची ही योग्य वेळ आहे.आम्ही सुडाच राजकारण कधी केलं नाही.आता या पाच जणांच्या प्रवेशाने आपली टीम मजबूत झाली आहे. आम्ही विकासाचा राजकारण करतो मात्र विरोधक सुडाच राजकारण करतात अशी टीका देखील त्यांनी केली.अमर नाईकवाडे यांनी तर कुंडलीच मांडली आहे असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी या पाच जणांची घरवापसी झाली आहे अस सांगत हे आमच्याच घरात होते पण दुसर घर झाल्याने तिकडे गेले मात्र ते घर बेघर झालं म्हणून हे परत मूळ घरात आले अस म्हटलं.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शिवसेना कधीच मुस्लिम विरोधी नाही.सेनेने साबीर शेख असोत की अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदाची संधी दिली,त्यामुळे मुस्लिमांनी घाबरून जायचे कारण नाही असे मत व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेले अमर नाईकवाडे म्हणाले की,जे स्वतःच्या बापाला नीट बोलत नाहीत,सहकाऱ्यांवर ब्लॅकमेलिंग चे आरोप करतात,जुन्या कामाचे स्वतः श्रेय घेतात ते डाकू आहेत अस म्हणत आ संदिप क्षीरसागर यांच्यावर टीका करत लगीन लोकांचं अन नाचतंय …….! अस म्हणत आ क्षीरसागर यांचे जुने सहकारी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केला.पाच टक्यासाठी झुकेगा अन दहा टक्यासाठी लोटांगण घालेगा अशी टीका केली.आमच्या नादाला लागू नका नाहीतर तुमची अंडी पिल्ले आम्ही बाहेर काढू असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
आमचा पिंड समाजकारण हाच आहे.आम्हाला जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे नगरसेवक पद मिळालं. आम्ही जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला आहे,त्यामुळे कोणी किंतु परंतु मनात ठेवू नये.आपल्याला सेनेच पीक जिल्ह्यात आणायचं आहे.काकू नाना विकास आघाडीत आम्ही काम केलं.याचा मूळ उद्देश हा रवींद्र क्षीरसागर यांच्यावरील अन्याय समोर ठेवून काम केलं.पदासाठी आम्ही सोबत कधीच नव्हतो.आमदार झाल्यावर हे रवी दादा सोबत कस वागले हे आम्ही पाहिलं आहे.जो माणूस स्वतःच्या वडिलांसोबत चुकीचं वागू शकतो तिथं आमचं काय ही शंका आली.
सभापती पदाच्या निवडिवेळी आम्हाला आमदारांचा निरोप आला की सभापती पद घ्यायची नाहीत.जिल्हा परिषद सभापती निवडीच्या वेळी सुद्धा गंगाभाऊ ला डावलल गेलं.कोविड मध्ये काम करताना आमची काम ऐकू नका अस सांगितले गेलं. आम्ही सामान्य लोकांसाठी काम करत होतो.लॉकडाऊन मध्ये आम्ही काम केलं,पण आमदार म्हणले मला विचारून काम केलं नाही.तेव्हा लक्षात आलं की हे किती खालच्या पातळीचे आहेत. आम्ही फसलोत म्हणून तुम्ही फसलात म्हणून ही चूक सुधारत आहोत.ब्लॅकमेल कोण करत होत हे त्यांनी स्वतःला विचारावं. 18 लोकप्रतिनिधी तुम्हाला सोडून गेले याचा विचार करावा.टोपल टोपल शेण खातेत अन शिंतोडे सहकाऱ्यांवर उडवतेत.नाहक बदनामी केली तर अंडे पिले बाहेर काढू असा ईशारा यावेळी नाईकवाडे यांनी दिला.जयदत्त अण्णा आणि पंकजाताई यांच्यामुळे मंजूर झालेली कामाचे श्रेय आमदार घेत आहेत.विकासपुरुष असाल तर दारातला रस्ता करा असे आव्हान दिले.शहरातील जी काम सुरू आहेत त्याचा दर्जा राखा. एकही कार्यालय नाही जिथं यांनी अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या नाहीत अस झालेलं नाही.यांच्यासाठी झिजलोत आम्ही,यांच्यावर माझे उपकार आहेत म्हणून एवढं बोलतो आहे.अस ते म्हणाले.यावेळी फारूक पटेल,बाबूसेठ लोढा,आणि नितीन लोढा यांनीही खदखद व्यक्त करून जनतेच्या सेवेसाठी फक्त अण्णांच्या सोबत आलो आहोत आमच्या काहीच अपेक्षा नाहीत जी चूक झाली त्यामुळे मतदार संघाचे मोठे नुकसान झाले असे ते म्हणाले
यावेळी युवानेते डॉ योगेश क्षीरसागर म्हणाले की,स्वतःला युवा नेता म्हणवून घेणाऱ्यांचे गुण आम्हाला लहान पणापासून माहीत आहेत,आमदार झाले की आकाशाला शिवल्याची भावना आ संदिप क्षीरसागर यांची झाली अन जवळच्या लोकांना बाजूला करायला सुरुवात केली .सच्चा कार्यकर्त्याला मोठ करण्याऐवजी स्वतःच्या निष्क्रिय बंधुला उपाध्यक्ष केलं अस म्हणत योगेश क्षीरसागर यांनी आ संदिप क्षीरसागर यांची पोलखोल केली बीडच्या आमदाराने स्वतःचा भाऊ,आई यांच्यासाठी कार्यकर्त्याला बाजूला केलं.टक्केवारी अन मानसिक छळ त्यांनी केला.यांना अडीच वर्षात स्वतःच्या बंधुसहित एका नगरसेवकाला सांभाळता आलं नाही.केंद्र आणि नगर पालिकेच्या माध्यमातून आणली जाणारे कामे आमदार उदघाटन करत आहेत. आमदाराने एकही काम केलं नाही,केवळ श्रेय घेत आहेत.राजुरी ते बीड रस्ता कंबरडे मोडणारा ठरत आहे.कोणतेही काम टक्केवारी शिवाय पुढं जात नाहीये.अशी टीका त्यांनी केली. तहसील असो की बी एन्ड सी प्रत्येक ठिकाणी टक्केवारी साठी लोक ठेवले आहेत.जे जे ब्लॅक चे धंदे चालतात ते सुसाट आहेत.वाळू असो की रेशन सगळीकडे आजी माजी आमदार पार्टनर आहेत.प्लॉटिंग करणाऱ्यांना सुद्धा त्रास दिला जातोय असे सांगून पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांनी घाबरू नये आम्ही सक्षमपणे पाठीशी आहोत,विकासासाठी सर्वजण एकत्र काम करू आणि झालेले नुकसान भरून काढू असे ते म्हणाले
या ऐतिहासिक प्रवेश सोहळ्यास हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता,यावेळी काही कार्यकर्त्यांनी जेसीबी द्वारे भला मोठा पुष्पहार घालून स्वागत केले