बीड शहरात होणार अत्यावश्यक वस्तूंची होम डिलेव्हरी;चारही बाजूंनी नाका-बंदी शहरात शुकशुकाट
बीड- एका कोरोना बाधित रुग्णामुळे संपूर्ण बीड शहरासह बारा गावांना लॉक डाऊन करण्याची वेळ आली पुढील आठ दिवस आता संचार बंदी लागू आहे यादरम्यान बीड शहरात ठिकाणी नाकाबंदी केली असून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत आज संपूर्ण शहरात शुकशुकाट होता या काळात नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या होम डिलिव्हरी संदर्भात लवकरच यंत्रणा जाहीर केली जाईल असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले आहेत
काल आढळून आलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाचा बीड शहरात अनेकांशी संपर्क आला हे लक्षात घेऊन संपूर्ण बीड शहरात आणि परिसरातील बारा गावांमध्ये कडकडीत संचार बंदी आदेश लागू करण्यात आली आहे आज पासून आठ दिवसात नागरिकांना अत्यावश्यक सेवेची अडचण येऊ नये यासाठी प्रशासनातर्फे यंत्रणा उभी केली जाणार आहे बीड शहरात अत्यावश्यक वस्तूंच्या होम डिलिव्हरी संदर्भात आज रात्री नेमकी यंत्रणा काय असेल याबाबत कळवले जाईल असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कळवले आहे