पत्रकार मिलिंद आदमाने यांना पितृशोक

आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार
बीड । वार्ताहरयेथील पत्रकार मिलिंद आदमाने यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक केरबा नारायण आदमाने यांचे आज बुधवारी (दि.6) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 75 वर्षाचे होते.लातूर जिल्ह्यातील आवसगाव येथील मुळ रहिवासी आणि ह.मु. बालाघाट शिक्षक कॉलनीतील रहिवासी असणारे दैनिक प्रजापत्रचे व्यवस्थापक मिलिंद आदमाने यांचे वडील तथा सेवानिवृत्त शिक्षक केरबा नारायण आदमाने हे मागील काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज अचानकपणे त्यांची प्रकृती बिघडली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मधुरवाणी आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्व परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भगवानबाबा प्रतिष्ठानच्या मागे असणार्‍या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आदमाने परिवाराच्या दु:खात लोकप्रश्‍न परिवार सहभागी आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!