बीड जिल्ह्यात 239 कोरोना बाधित:देशात तीन लाख पार तर राज्यात 43697 बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2191जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 239 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1952 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 64 आष्टी 20 बीड 57 धारूर 7 गेवराई 12 केज 16 माजलगाव 8 परळी 33 पाटोदा 3 शिरूर 10 वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात कोरोनाच्या 43697 नव्या रुग्णांची भर
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 43 हजार 697 नव्या रुग्णांची भर झाली असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 46, 591 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल राज्यात कोरोनाच्या 39 हजार 207 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज चार हजार रुग्णांची वाढ झाली आहे
राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.93 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 69 लाख 15 हजार 407 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.04टक्के आहे.
देशभरात ३ लाख १७ हजार ५३२ बाधितांची नोंद
देशातील करोना रुग्णसंख्या स्थिर झाल्याचं वाटत असताना पुन्हा मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात गेल्या आठ महिन्यांतील उच्चांकी करोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात ३ लाख १७ हजार ५३२ बाधितांची नोंद करण्यात आली असून ४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यासोबतच २ लाख २३ हजार ९९० रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.
देशात सध्या १९ लाख २४ हजार ५१ सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट सध्या १६.४१ टक्क्यांवर आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९३.६९ टक्क्यांवर आहे. गेल्या २४ तासांत देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. देशात सध्या ओमायक्रॉनचे ९ हजार २८७ रुग्ण आहेत. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ओमायक्रॉन रुग्णांमध्ये ३.६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आतापर्यंत ३ कोटी ५८ लाख ७ हजार २९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)