बीड जिल्ह्यात 144 कोरोना बाधित:राज्यात 31111 तर देशात 2 लाख 38018 रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1650 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 144 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1506 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 19 आष्टी 16 बीड 37 धारूर 10 गेवराई 7 केज 3 परळी 26 पाटोदा 10 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात कोरोनाच्या 31 हजार 111 नव्या रुग्णांची भर
मुंबई : गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत राज्याला आज काहीसा दिलासा मिळाला असून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसून येतंय. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 31 हजार 111 नव्या रुग्णांची भर झाली असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 29, 092 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या आधी रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर असायची, त्यात आता घट होत असल्याचं दिसून येतंय.
राज्यात 112 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 112 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1860 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 959 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 24 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.95 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के आहे
देशात काल २ लाख ३८ हजार १८ बाधित
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या (ता.१७) तुलनेत २० हजार ७१ रुग्णांनी घट झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
मृत्यूमध्येही कालच्या तुलनेत घट झाली आहे. आज ३१० मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील पॉझिटिव्हीटीचा रेट १४.४३ टक्के झाला आहे.
देशात काल २ लाख ३८ हजार १८ बाधित आढळून आले, तर ३१० जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे १ लाख ५७ हजार ४२१ जण कोरोनामुक्त झाले. देशात १७ लाख ३६ हजार ६२८ ॲक्टिव्ह केसेस आहेत. देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८ हजार ८९१ वर पोहोचला आहे. कालपासून ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत ८.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)