बीड

बीड जिल्ह्यात 129 कोरोना बाधित:राज्यात 41327 तर देशात 2 लाख 58089 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1056 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 129 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 927 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 20 आष्टी 3 बीड 59 धारूर 2 गेवराई 2 केज 9 माजलगाव 2 परळी 7 पाटोदा 12 शिरूर 7 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात 41 हजार 327 नव्या रुग्णांची भर

राज्यात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात 41 हजार 327 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात 40368 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णाची संख्या 68,00,900 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.3% एवढे झाले आहे.

आज राज्यात 8 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 1738 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. 932 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

देशात काल २ लाख ५८ हजार ८९ कोरोना बाधित

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत १३ हजार १११ ने घट झाली आहे. देशात काल २ लाख ५८ हजार ८९ बाधित आढळून आले, तर ३८५ जणांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे १ लाख ५१ हजार ७४० जण कोरोनामुक्त झाले. देशात आजघडीला १६ लाख ५६ हजार ३४१ ॲक्टिव्ह केसेस आहेत. देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८ हजार २०९ वर पोहोचला आहे.

दरम्यान लसीकरण मोहिमेला रविवारी एक वर्षे पूर्ण झाले असून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 156.76 कोटी डोसेस देण्यात आले आहेत. कोरोना झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 71 लाख 22 हजार 164 वर गेली आहे तर बरे झालेल्या लोकांची संख्या 3 कोटी 50 लाख 85 हजार 721 इतकी आहे. कोरोनाने बळी घेतलेल्या एकूण लोकांची संख्या 4 लाख 86 हजार 66 वर गेली आहे.

कोरोनाच्या ताज्या लाटेचा विचार केला तर महाराष्ट्र हे सर्वाधिक प्रभावी राज्य आहे. महाराष्ट्रात गत चोवीस तासात 42 हजार 462 रूग्ण सापडले. या कालावधीत 23 लोकांचा मृत्यू झाला. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 2.6 लाखांवर गेली आहे. मुंबईत चोवीस तासात 81 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात ओमायक्रॉनचे 125 नवे रुग्ण सापडले असून येथील या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या 1730 वर गेली आहे.

1 मार्च 2021 पासून गंभीर आजार असलेल्या 45 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते तर याच वयोगटातील सर्व लोकांच्या लसीकरणाला एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली होती. 18 वर्षावरील लोकांच्या लसीकरणाला 1 मे 2021 पासून सुरुवात झाली होती.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *