बीड जिल्ह्यातही कडक निरबंध लागू:जिल्हाधिकारी यांचे आदेश
कोरोना विषाणू (कोविड-१९) प्रादुर्भाव नियंत्रणासाठी व उपाययोजनाबाबत दिशानिर्देश देण्यात आले आहेत
राज्य शासनाकडील उपरोक्त संदर्भ क्र.5 अन्वये कोविड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रिडा व मनोरंजन विषयक क्षेत्रातील कार्याना कोविड-19 सर्वत्र साथरोग येण्यापूर्वी,विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळानुसार, काही शर्तीना अधीन राहून, खुले करण्यात येत असलेबाबत निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने या कार्यालयाने संदर्भ क्र.6 अन्वये आदेश निर्गमित केले होते. तसेच राज्य शासनाचे संदर्भीय आदेश क्र.8 नूसार
या कार्यालयाचे संदर्भीय आदेश क्र.9 पारित करण्यात आलेले आहेत. आणि ज्या अर्थी , शासनाने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता संदर्भीय आदेश क्र.10 नूसार नविन मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या आहेत.
बीड जिल्हयाकरिता दिनांक 31 डिसेंबर ,2021 चे मध्यरात्री 12.00 वा.पासून खालील निबंध लागू करण्यात येत आहेत.
- बंदीस्त जागेतील किंवा खुल्या जागेतील कोणत्याही लग्न समारंभाकरिता उपस्थितांची संख्या (केटर्स, मंडप डेकोरेटर्स, धार्मिक विधी करणारे पुरोहित इत्यादी सर्व समाविष्ट करुन) उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.
- बंदीस्त जागेतील किंवा खुल्या जागेतील कोणत्याही सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रमांना/ मेळाव्यांना /समारभांना उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादीत असेल.
- सर्व समाजांच्या अंत्यविधी च्या कार्यक्रमास उपस्थितांची कमाल संख्या 20 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.
- जिल्हयाच्या कोणत्याही उपविभागातील पर्यटन स्थळे, मैदाने तसेच गर्दी जमा होणा-या ठिकाणी आवश्यकता वाटल्यास संबंधीत उप विभागीय दंडाधिकारी यांनी त्या उपविभागातील विशिष्ट भागांच्या हद्दीपावेतो आवश्कतेनूसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे बाबत कार्यवाही अनुसरावी.
- तसेच यापूर्वी लागू असलेले सर्व निबंध या कार्यालयाचे पूढील आदेशापर्यंत लागू राहातील.
उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास
संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग अधिनियम आणि भारतीय दंडसंहिता 1860 मधील तरतुदी अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाची काटकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित
विभागांची राहील.असे आदेश राधाबिनोद अ.शर्मा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांनी आजच जारी केले आहेत