बीड जिल्हयात १५ ते १८ वर्ष वयोगटाच्या मुलांचे लसीकरण ३ जानेवारी पासुन
कोविड १९ महामारीच्या प्रतिबंधासाठी १६ जानेवारी पासुन कोविड १९. लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोविड १९ लसीकरण मोहीमे अंतर्गत जिल्हयातील शासकीय व खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच कोविड १९ मध्ये काम करणारे अंगणवाडी कर्मचारी व आशा कार्यकर्ती फ्रंटलाइन कर्मचारी जसे कोविड संदर्भात काम करणारे शिक्षक,पोलीस, पंचायतराज,महसुल इ.सर्व कर्मचा-यांना लसीकरण करण्यात आले.
१८ पेक्षा जास्त वयोगटाच्या १५८८४०८ नागरीकांचा पहीला डोस व ८९६६२४ नागरीकांचा दुसरा डोस आजतागायत पुर्ण करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या २९/१२/२०२१ रोजीच्या सुचनेनुसार बीड जिल्हयात १५ ते १८ वर्ष वयोगटाच्या मुलांचे लसीकरण ३ जानेवारी २०२३ पासुन सुरु करण्यात येणार आहे.
१५ ते १८ वर्ष वयोगटाच्या मुलांचे लसीकरणाकरीता शासनातर्फे १४२९१९ उददीष्ठ देण्यात आले आहे.
• राज्य शासनाच्या सुचनेनुसार १५ ते १८ वर्ष वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सीन लसीचाच वापर करण्यात येणार आहे.
१५ ते १८ या वयोगटाकरीता सन २००७ पुर्वी जन्मलेलेच लाभार्थी पात्र राहतील.
• या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण शाळा ,महाविदयालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
लसीकरणाच्या नियोजनाकरीता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. संजय कदम यांनी वैदयकीय अधिकारी , आरोग्य कर्मचारी यांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले आहे
नागरिकांनी मास्क,सॅनिटायझर ,कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करुन कोविड लसीकरण प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन डॉ रौफ शेख जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद बीड यांनी केले आहे