बीड

पाटोदा तालुक्यातील सहा व शिरूर मधील तीन गावात पूर्णवेळ संचारबंदी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड/प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यात कारेगाव येथे कोरोना विषाणू लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पुढील
प्रमाणे फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार कारेगाव पासून 3 की मी परिसरात कारेगाव,कारेगाव भोसले वस्ती,कठाळवाडी,जननेवाडी, नाळवंडी, व शिरूर तालुक्यातील उखळवाडी,मोरजळवाडी, व येवळवाडीनाथ (जानपीर) हा परिसर कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *